नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:54 IST2021-06-16T04:54:04+5:302021-06-16T04:54:04+5:30

-------------- बांबर्डा परिसरात अनियमित वीजपुरवठा वाशिम : परिसरातील इतर काही गावांमध्ये आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. ...

Farmers demand compensation | नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

--------------

बांबर्डा परिसरात अनियमित वीजपुरवठा

वाशिम : परिसरातील इतर काही गावांमध्ये आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे उन्हाळी पिकांचे सिंचन प्रभावित होत असल्याने शेतकरी, तर तापत्या उन्हात घरातील पंखे बंद राहत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

-----------------

शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वाशिम : मानोरा तालुक्यातील साखरडोह येथे कृषी विभागामार्फत बीज प्रक्रिया व बियाणे उगवण शक्ती तपासण्यासंदर्भात १५ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. कृषी सहायकांनी मार्गदर्शन केले.

------------------

सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी

वाशिम : सर्दी, खोकला, आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत म्हणून मानोरा तालुका आरोग्य विभागाने परिसरात मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सोमवारी रुग्णांची आरोग्य तपासणी केली.

------------------

मनभा परिसरात पाऊस

वाशिम : कारंजा तालुक्यातील मनभा परिसरात मंगळवारी सायंकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकरी सुखावला असून मोठ्या प्रमाणात पेरणीला सुरुवात झाली आहे.

Web Title: Farmers demand compensation