शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

 विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष संघटनेचा मोर्चा ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 18:26 IST

शेतकरी संघर्ष संघटना व युवकांच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महापोर्टल बंद करावे, सर्व स्पर्धा परीक्षा आॅफलाईन पद्धतीने घेण्यात याव्या यासह विविध मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष संघटना व युवकांच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला.स्थानिक श्री शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पूजन व हारार्पण करून या मोर्चाला सकाळी ११ वाजता सुरूवात करण्यात आली. पाटणी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक, सिव्हिल लाईन मार्गे हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचला. यावेळी शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ वानखेडे, जिल्हाध्यक्ष गणेश अढाव यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांनी या मोर्चाला संबोधित केले. महापोर्टल बंद करण्यात यावे, सर्व परीक्षा आॅफलाईन घेण्यात याव्या, प्रत्येक परीक्षेची प्रक्रिया जलद घेण्यात यावी, दरवर्षी रिक्त पदे भरण्यात यावी, जिल्हा शासकीय नोकरी भरती जिल्ह्याच्याच ठिकाणी व्हावी, पोलीस भरती प्रक्रिया ही अगोदर शारीरिक चाचणी व नंतरच लेखी चाचणी घेण्यात यावी, एक परीक्षा व एक पेपर एकाच दिवशी घेण्यात यावा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाचे उपकेंद्र वाशिम येथे स्थापन करून मागील २२ वर्षाच्या प्रलंबित मागणीला न्याय द्यावा आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन देण्यात आला. या मोर्चात शेतकरी संघर्ष संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवकांची उपस्थिती होती. या भव्य मोर्चाने वाशिमकरांचे लक्ष वेधून घेतले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagitationआंदोलन