शेतकर्यांचा भाजीपाला ‘स्वस्त’ तर व्यापार्यांचा ‘महाग’
By Admin | Updated: July 20, 2014 22:45 IST2014-07-20T22:45:24+5:302014-07-20T22:45:24+5:30
शेतकर्यांचा ताजा भाजीपाला ‘मातीमोल’ भावाने विकत घ्यायचा आणि नंतर तोच शिळा झालेला भाजीपाला दुप्पट ते चौपट दराने विकायचा

शेतकर्यांचा भाजीपाला ‘स्वस्त’ तर व्यापार्यांचा ‘महाग’
वाशिम : एकामागून एक कोसळणार्या नैसर्गिक व मानवी संकटांतून स्वत:ला सावरत असलेल्या शेतकर्यांचा व्यापार्यांकडूनदेखील ह्यगेमह्ण होत आहे. शेतकर्यांचा ताजा भाजीपाला ह्यमातीमोलह्ण भावाने विकत घ्यायचा आणि नंतर तोच शिळा झालेला भाजीपाला दुप्पट ते चौपट दराने विकायचा, असा गोरखधंदा केला जात आहे. घाम गाळून फुलविलेल्या भाजीपाल्याच्या अत्यल्प दरानेही शेतकर्यांच्या पदरात निराशाच टाकली आहे. विविध कारणांमुळे शेती करणे परवडेनासे झाल्याचा सूर शेतकरीवर्गातून निघत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी शेतात सिंचनाची सुविधा करून भाजीपाला घेत आहेत. लागवड ते बाजारपेठेपर्यंतचा भाजीपाल्याचा प्रवास मोठा कठीण आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे जपल्यानंतर भाजीपाला कुठे बाजारपेठेपर्यंत पोहोचतो. वन्यप्राण्यांचा हैदोस, निसर्गाचा लहरीपणा, हवामान बदल यामधून बचावलेला भाजीपाला शेतकरी मोठय़ा आशेने बाजारात आणतात. मात्र, येथे आल्यानंतर त्यांचा ताजा भाजीपाला मातीमोल भावाने हर्रासी पद्धतीद्वारे खरेदी केला जातो. ठोक पद्धतीने शेतकर्यांकडून अत्यल्प दरात कांदा, वांगे, टमाटे, कोबी, मेथी, पालक, गवार आदी भाजीपाला घेतला जातो. नंतर हाच भाजीपाला व्यापार्यांकडून पाव, अर्धा किलो, एक किलो अशा स्वरुपात ग्राहकांना विकला जातो. सद्यस्थितीत भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र, याचा फायदा शेतकर्यांऐवजी व्यापार्यांनाच होत असल्याचे ह्यआकडेवारीह्ण सांगते. शेतकर्यांकडून १0-१५ रुपये किलोप्रमाणे खरेदी केलेला कांदा नंतर ग्राहकांना २५ ते ३0 रुपये दराने व्यापारी विकतात. भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडत असल्याची ओरड होत आहे. प्रत्यक्षात मात्र या भावाचे दाम शेतकर्यांच्या खिशात जशास तसे जात नसल्याचे वास्तव आहे. समाधानकारक भाव नसल्याने फारसे उत्पन्न हाती येत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकर्यांनी व्यक्त केल्या.