शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी मालेगाव तहसिल कार्यालय परिसरात कपाशीची झाडे जाळून केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 16:18 IST

 मालेगाव :  बोंडअळीमुळे कपाशीला जबर फटका बसला असून, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. यामुळे संतप्त होत मालेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी ५ मार्च रोजी तहसिल कार्यालय परिसरात कपाशीची झाडे जाळून निषेध नोंदविला तसेच नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणी तहसिलदारांमार्फत राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देनुकसानभरपाईच्या निकषात आता काही बदल करण्यात आल्याने याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसणार आहे.त्यामुळे मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी या भरपाईपासून वंचित राहणार आहेत. यावेळी तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात कपाशीची काही झाडे जाळून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविला.

 मालेगाव :  बोंडअळीमुळे कपाशीला जबर फटका बसला असून, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. यामुळे संतप्त होत मालेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी ५ मार्च रोजी तहसिल कार्यालय परिसरात कपाशीची झाडे जाळून निषेध नोंदविला तसेच नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणी तहसिलदारांमार्फत राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे केली.

गतवर्षी पावसाने सरासरी गाठली नव्हती. परिणामी, खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट आली होती. त्यानंतर बोंडअळीने कापूस उत्पादक शेतकºयांच्या नाकीनऊ आणले होते. बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई देण्याचे नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जाहिर केले होते. नुकसानभरपाईच्या निकषात आता काही बदल करण्यात आल्याने याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसणार आहे. ३० टक्के व त्यापेक्षा अधिक नुकसान असणाºया शेतकऱ्यांना नुकसाभरपाई मिळणार आहे. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी या भरपाईपासून वंचित राहणार आहेत. अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची नावे नुकसान भरपाईच्या यादीत समाविष्ठ करावी, या मागणीसाठी मालेगाव तालुक्यातील काही शेतकरी तहसिल कार्यालयावर ५ मार्चला धडकले. यावेळी तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात कपाशीची काही झाडे जाळून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यां ना १२ मार्चपर्यंत नुकसानभरपाई देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यां नी दिला. यावेळी तहसिलदार राजेश वझिरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गजानन केंद्रे, भगवान बोरकर, गजानन बोरचाटे, अजय घुग,े पांडुरंग ठाकरेख राजू बोरचाटे, अशोक ठाकरे, वामन बोरचाटे, गजनन गव्हांदे, विजय भालेराव, अनिल जाधव, अश्विन भेंडेकर यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकऱ्यां ची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवFarmerशेतकरीagitationआंदोलन