शेतकर्‍याची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:27 IST2017-10-04T02:26:40+5:302017-10-04T02:27:55+5:30

Farmer suicides! | शेतकर्‍याची आत्महत्या!

शेतकर्‍याची आत्महत्या!

ठळक मुद्देवसारी येथील घटनागळफास घेऊन आत्महत्या


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: येथून जवळच असलेल्या वसारी येथील बबन  दत्तूजी लादे (वय ४३ वर्षे) या शेतकर्‍याने मालेगाव रस्त्यावरील  शेताच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३  ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मृत शेतकर्‍याने आपल्या शेतातील सोयाबीनची नुकतीच सोंगणी  केली असून, अपेक्षित उत्पन्न झाले नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज  कसे फेडावे, या विवंचनेत असल्यानेच त्यांनी आत्महत्या केली  असावी, असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला. याप्रकरणी शिरपूर  पोलिसांनी र्मग दाखल केला आहे. 

Web Title: Farmer suicides!