शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गव्हापेक्षा शेतकऱ्यांची हरभऱ्याला अधिक पसंती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 15:20 IST

अधिक उत्पादन तसेच सिंचनासाठी लागणारे कमी पाणी यामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची तर गव्हाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबर व आॅक्टोंबर महिन्यात सतत पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे खरीप हंगामात आलेला तोटा रब्बी हंगामात भरून निघेल या आशेवर रब्बी हंगामात गव्हापेक्षा हरभऱ्याला शेतकऱ्यांची पसंती झालेल्या पेऱ्यावरुन दिसून येते. हरभरा पिकाला येत असलेला कमी खर्च व त्यातून मिळणारे अधिक उत्पादन तसेच सिंचनासाठी लागणारे कमी पाणी यामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची तर गव्हाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सरासरी क्षेत्राच्या ३० टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. सरासरी ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी अपेक्षीत असताना आजपर्यंत २४ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी झाली असून, यात हरभरा पिकाचे प्रमाण १८ हजार हेक्टर, तर गहू पिकाचे प्रमाण ५ हजार ५०१ हेक्टर आहे. वाशिम जिल्ह्यात सरासरी ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी अपेक्षीत असताना कृषी विभागाने १ लाख ३० हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात यंदा रब्बी पेरणीचे नियोजन केले होते.तथापि, अवकाळी पावसाने आॅक्टोबरच्या मध्यंतरापासूनच थैमान घातल्याने रब्बी पिकांची पेरणी खोळंबली. त्यामुळे गळीत पिकांच्या क्षेत्रावर परिणाम झाला, तर तृण पिकांचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात घटत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, हरभरा आणि गहू पिकाचे क्षेत्र यंदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ६२ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रात हरभरा पिकाची पेरणी होते. सद्यस्थितीत १८ हजार हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. गहू पिकाचे क्षेत्र २८ हजार ४१७ हेक्टर अपेक्षीत असताना सद्यस्थितीत ५ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाल्याच्या कृषी विभागाच्या अहवालावरुन शेतकºयांनी गव्हापेक्षा हरभऱ्या पसंती दिल्याचे दिसून येत आहे. कारंजा तालुक्यात १७४८ हेक्टरवर होणार रब्बीची पेरणीकारंजा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, सन २०१९-२० या वर्षांत कारंजा तालुक्यात १ हजार ७४८ हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी करण्यात येणार आहे. शिवाय यंदाच्या पावसाळ्यात भरपूर पाउुस झाल्याने उपलब्ध जलस्त्रोतात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्याचा वापर सिंचनासाठी करून रब्बी पेºयात वाढ करावी असा मानस शेतकºयांकडून व्यक्त केल्या जात आहे. तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पेरणी अहवालावरुन हरभºयाच्या क्षेत्रात वाढ होण्याची तर गव्हाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या रब्बी हंगामात कांरजा तालुक्यात सर्वाधिक १ हजार २३५ हेक्टरवर हरभरा त्यापाठोपाठ ४७० हेक्टरवर गहू तर १२ हेक्टरवर करडई आणि ३१ हेक्टरवर रब्बी हंगामातील इतर पिके पेरल्या जाण्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी