वळूच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By Admin | Updated: June 9, 2015 02:15 IST2015-06-09T02:15:19+5:302015-06-09T02:15:19+5:30
काटा येथे गेल्या महिनाभरापासून वळूची काटा गावात दहशत.

वळूच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
वाशिम : नजिकच्या काटा येथे गेल्या महिनाभरापासून एका मस्तवाल वळू (सांड) ने गावात दहशत माजविली असून, ८ जून रोजी या वळूने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. या वळूने शेतात जाणारे शेतकरी व महिलांवर प्राणघातक हल्ला चढविला. त्यात शेतकरी सदाशिव निंबलवार गंभीर जखमी झाले; निंबलवार यांच्यावर काटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.