गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकरी गारद

By Admin | Updated: March 11, 2015 01:47 IST2015-03-11T01:47:25+5:302015-03-11T01:47:25+5:30

गहू, संत्रा व पपईचे नुकसान.

Farmer Garard in the district due to hailstorm | गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकरी गारद

गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकरी गारद

वाशिम : जिल्ह्यात ९ मार्च रोजी वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाचे आगमन झाले. कारंजा, मानोरा व मंगरूळपीर या तालुक्यांमध्ये गारपीट झाल्याने संत्रा, पपई, लिंबू, केळी, बिजवाईचा कांदा, टरबूज, खरबूज तसेच रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकरी या सततच्या संकटांमुळे गारद झाले आहेत.
जिल्ह्यात १0 मार्च रोजी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी २७.५७ मि.मि. पावसाची नोंद करण्यात आली. यामध्ये वाशिम तालुक्यात ३४, मालेगाव तालुक्यात ३, रिसोड तालुक्यात ९.३0, मंगरूळपीर तालुक्यात ३१.३0 मानोरा तालुक्यात ७८, तर कारंजा तालुक्यात ९.८0 असा एकूण १६५.४0 मि.मी. पाऊस पडला. जिल्ह्याची सरासरी २५.५७ मि.मी. आहे. या अवकाळी पावसासह कारंजा, मानोरा व मंगरुळपीर तालुक्यात गारपिटीने शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या तीनही तालुक्यांतील गहू पूर्णपणे झोपला, संत्र्याला मोठय़ा प्रमाणात गारांचा मार लागल्याने मोठे नुकसान शेतकर्‍यांना झेलावे लागले आहे. पपईचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने फळउत्पादक शेतकरी मदतीची अपेक्षा करीत आहेत.
मानोरा तालुक्यातील गारपिटीने नुकसानग्रस्त झालेल्या भागाची जिल्हाधिकारी कुलकर्णी, तर मंगरूळपीर तालुक्यातील भागांची तहसीलदार बळवंत अरखराव यांनी पाहणी केली.

Web Title: Farmer Garard in the district due to hailstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.