अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By सुनील काकडे | Updated: September 30, 2023 20:49 IST2023-09-30T20:35:41+5:302023-09-30T20:49:30+5:30
शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह कामठा शिवारात पावसाने हजेरी लावली.

अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
वाशिम : जिल्ह्यातील ग्राम कामठा (ता. कारंजा) येथील शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह कामठा शिवारात पावसाने हजेरी लावली. यादरम्यान शेतात असलेले शेतकरी सारंगधर मोहन मुंडाले (४५) यांच्या अंगावर आकाशातून सळसळत आलेली वीज कोसळली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुंडाले हे रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांची पत्नी व मुलगा त्यांच्या शोधार्थ बाहेर पडले असता, शेतावरील धुऱ्यावर शरीर भाजलेल्या अवस्थेत मुंडाले पडून असल्याचे आढळले.
मृतक मुंडाले हे अल्पभूधारक शेतकरी असून कुटूंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. त्यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ४० हजार रुपये कर्ज असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.