पोक्रा प्रकल्पांंतर्गत कापूस पिकावरील शेतीशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST2021-08-15T04:41:39+5:302021-08-15T04:41:39+5:30

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ आर. एस. डवरे, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी उपस्थित ...

Farm on cotton crop under Pokra project | पोक्रा प्रकल्पांंतर्गत कापूस पिकावरील शेतीशाळा

पोक्रा प्रकल्पांंतर्गत कापूस पिकावरील शेतीशाळा

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ आर. एस. डवरे, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी उपस्थित होते. शेतीशाळेत कीटकशास्त्रज्ञ आर. एस. डवरे यांनी कापूस पिकावरील विविध रोग व कीटकांबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना स्वनिरीक्षणाद्वारे अवगत केले. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा वापर व निंबोळी अर्क फवारणी, चिकट सापळ्याचा वापर आदी बदल करण्याबाबत मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी दत्ता चौधरी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पोक्रा प्रकल्पाबाबत मार्गदर्शन केले व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी मानोरा तालुका कृषी अधिकारी किशोर सोनटक्के, मंडळ कृषी अधिकारी विनोद घोडेकर, कृषी सहायक खुडे, सरपंच राहुल भगत, शेतीशाळेचे होस्ट फार्मर सुरेंद्र देशमुख, शेतीशाळा समन्वयक घुले, अशोक फुके, समूह सहाय्यक शुभम मात्रे व गावातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेतीशाळा प्रशिक्षक शिवाजी वाघ, ज्ञानेश्वर तायडे, श्रीनाथ देशमुख, अविनाश इंगळे, मोहसीन फकिरावाले आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Farm on cotton crop under Pokra project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.