शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बनावट शासन आदेशाने केला गावाचा कायापालट!

By admin | Updated: September 20, 2014 01:09 IST

खामगाव तालुक्यातील एका गावात धडकले बनावट शासन आदेश; घरकुलापोटी घरा-घरात शौचालयं.

लक्ष्मण ठासरे/पळशी बु. (खामगाव)५00 घरकूलं मंजूर झाल्याचे बनावट शासन आदेश खामगाव तालुक्यातील एका गावात धडकले आणि या आदेशाने गावाचा कायापालट करून टाकला. घरकुलांचा लाभ मिळेल, या आशेने ग्रामस्थांनी घरा-घरात शौचालयं बांधली आणि ग्राम पंचायतच्या थकीत कराचा भरणाही केला. कागदाच्या एका तुकड्याने गावाचं भलं झालं असलं तरी, यामागे फसवणुकीचा प्रकार असल्याने यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथील ग्रामस्थांनी २000-0१ या वर्षात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याने, राज्य शासनाकडून यशवंत ग्राम पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या एक महिना अगोदर, म्हणजे यावर्षीच्या जून महिन्यात गावातील एका ई महासेवा केंद्राच्या नावे बुलडाणा येथील पोस्टाचा शिक्का असलेले पाकिट आले. पळशी गावाला यशवंत ग्राम पुरस्कार मिळाल्याने राजीव गांधी यशवंत ग्राम आवास योजनेअंतर्गत घरकूल अनुदान योजनेमधून प्रत्येकी २ लाख २0 हजार रुपये खर्चाची ५00 घरकुलं मंजूर झाली असल्याचा शासन आदेश या पाकिटात होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या घरी शौचालय असणे, असेल तर त्याचा वापर सुरू असणे आणि ग्राम पंचायत कराची कोणतीही थकबाकी नसणे, या अटी शासन आदेशात नमुद करण्यात आल्या होत्या. हे पत्र ई महासेवा केंद्राच्या संचालकाने ग्रामस्थांना दाखविले. त्यानंतर गावकर्‍यांना या आदेशाची माहिती देण्यासाठी दवंडीसुध्दा देण्यात आली. त्यानंतर बुलडाणा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) यांच्या नावे असलेले आणखी एक पत्र पळशी येथे आले. त्यानुसार ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी ग्रामस्थांना अर्ज देवून, अटी पूर्ण केल्यास घरकूल मिळवून देण्याचे आश्‍वासन देण्यास सुरुवात केली. या अटींच्या पुर्ततेसाठी काही ग्रामस्थांनी कर्ज घेतले, काहींनी नातेवाईकांकडून उसनवारीने पैसे घेतले, काहींनी तर मिळेल त्या भावाने जनावरं आणि अगदी दागिणे मोडून शौचालयाचे काम पूर्ण करुन घेतले. ज्या ग्रामस्थांकडे ग्राम पंचायतचा कर थकीत होता, त्यांनीही जुळवाजुळव करून कराचा भरणा केला. सर्व अटींची पूर्तता केल्यानंतर ग्रामस्थ अर्ज घेवून ग्राम सचिवाकडे गेले असता, अशा कोणत्याही योजनेबाबत आपणाकडे कोणताही शासन आदेश नसल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे. ** ग्राम पंचायत निवडणुकीची किनार२३ मार्च २0१४ रोजी पळशी ग्राम पंचायतीची निवडणूक झाली. त्यावेळी गावातील पुढारी व ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी ग्रामस्थांना घरकूल मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. आता मात्र ही मंडळी या प्रकारावर चुप्पी साधून आहे.