मालेगावमध्ये अपक्षांवर पक्षांची नजर
By Admin | Updated: December 23, 2015 02:29 IST2015-12-23T02:29:40+5:302015-12-23T02:29:40+5:30
मालेगाव नगर पंचायत निवडणुकीत प्रत्येक वार्डात अपक्षांनी केलेत उमेदवारी अर्ज दाखल.

मालेगावमध्ये अपक्षांवर पक्षांची नजर
मालेगाव (जि. वाशिम): मालेगाव नगर पंचायत निवडणुकीत प्रत्येक वार्डात अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी प्रयत्न सुरू केले आहे. सध्या उमेदवार प्रचारापेक्षा अपक्षांना आपल्या बाजूने बसविण्यावर प्रमुख पक्षांचे उमेदवार भर देत आहेत. प्रमुख पक्षाच्या उमेदवाराला अडथळा ठरत असलेल्या अपक्षांना प्रलोभन देऊन अर्ज मागे घ्यायला लावण्यात येत आहे. त्याकरिता उमेदवारांची मनधरणी सुरू झाली असून, विविध आमिषेही दाखविण्यात येत आहे. नगर पंचायतीच्या प्रचाराला आता गती येत असून, नगरसेवक पदाची स्वप्ने बाळगणार्यांनी राजकीय सेटिंग सुरू केली आहे. मालेगाव शहराचा विकास अपेक्षेप्रममाणे झाला नाही. रस्ते, पाणी वीज, आरोग्य यासारख्या मूलभूत गरजासाठी मालेगाववासीयांना संघर्ष करावा लागतो. आता नगरपंचायत झाल्याने विकासाच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. कुठल्याही स्थितीत नगरसेवक व्हायचे हे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या काही पदाधिकार्यांचे स्वप्न आरक्षणामुळे अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला भविष्यात सोईस्कर ठरणार्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात येत आहे. आरक्षणामुळे सध्या राजकीय गोटात आता ह्यकही खुशी कही गमह्ण अशी स्थिती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना शिवसंग्राम व शेतकरी संघटना हे राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. १७ प्रभागांपैकी ९ प्रभागात महिला आरक्षण निघाले असल्यामुळे अनेकांच्या अपेक्षांवर विरजण पडले आहे. तर काही नेत्यांनी आपल्या पत्नीना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी चालविली आहे.