नेत्रदान हेच श्रेष्ठदान : स्वीटी गोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:28 IST2021-06-11T04:28:05+5:302021-06-11T04:28:05+5:30

प्रश्न : नेत्रदानाबाबत आपण काय सांगाल? नेत्रदान म्हणजे दात्याच्या मृत्यूनंतर त्याचे/ तिचे डोळे दुसऱ्या कोणाला तरी दान करणे. ज्यांचे ...

Eye donation is the best gift: Sweetie Gote | नेत्रदान हेच श्रेष्ठदान : स्वीटी गोटे

नेत्रदान हेच श्रेष्ठदान : स्वीटी गोटे

प्रश्न : नेत्रदानाबाबत आपण काय सांगाल?

नेत्रदान म्हणजे दात्याच्या मृत्यूनंतर त्याचे/ तिचे डोळे दुसऱ्या कोणाला तरी दान करणे. ज्यांचे डोळे कॉर्नियल इन्फेक्शनमुळे खराब झाले आहेत, त्यांना नेत्रदानाचा फायदा होतो. ज्या लोकांना बुबुळाच्या विकारामुळे अंधत्व आले आहे, अशा लोकांना दृष्टी प्रदान करण्यासाठी नेत्रदानाचा टक्का वाढणे आवश्यक आहे.

प्रश्न : अंधत्वाची कारणे काय सांगता येतील?

उत्तर : अंधत्वाची अनेक कारणे आहेत. डोळ्याला होणारी इजा, बुबुळाला होणाऱ्या जखमा, दिवाळीमध्ये असंरक्षितरित्या पेटविलेले फटाके, कुपोषणामुळे, इन्फेक्टान (जंतू प्रादुर्भाव), देवी, कांजिण्या आदी विकारांमुळे, डोळ्यात काही केमिकल्स गेल्यास, अनुवंशिकता आदींमुळे अंधत्व येऊ शकते.

प्रश्न : नेत्रदान कोण करू शकतो?

उत्तर : नेत्रदान केवळ मृत्यूनंतर करता येते, बालकापासून वृध्दांपर्यंत कोणीही व्यक्ती नेत्रदान करू शकते, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती, ज्यांना चष्मा आहे, रक्तदाब, मधुमेह, दमा आदी विकार असलेले नागरिकही नेत्रदान करू शकतात.

प्रश्न : नेत्रदान कोण करू शकत नाही?

उत्तर : एड्स, हिपॅटायटीस (लिव्हरचे आजार), सेप्टिसिमिया (रक्तातील जंतू प्रादुर्भाव), ब्लड कॅन्सर आदी आजार असलेल्या व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत.

प्रश्न : इच्छापत्र भरले नसेल, तरीही नेत्रदान करता येते का?

उत्तर : नेत्रदानासाठी इच्छापत्र भरणे आवश्यक आहे. मृत व्यक्तीने नेत्रदानाचे इच्छापत्र भरले नसेल, तरीही नातेवाईकांना त्या व्यक्तीचे नेत्रदान करता येते. डोळ्यातील बुबुळ मृत्यूनंतर सहा तासांच्या आत काढावे लागतात. त्यामुळे मृत व्यक्तीचे नेत्रदान करावयाचे असल्यास लवकरात लवकर आरोग्य विभाग किंवा नेत्रपेढीशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

Web Title: Eye donation is the best gift: Sweetie Gote