मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र चिकटवून प्रशासनाप्रति व्यक्त केला रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST2021-08-15T04:41:57+5:302021-08-15T04:41:57+5:30

रिसोड तालुक्यातील अंचल येथील दिव्यांग शेतकरी बाबुराव वानखेडे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची शेतजमीन काहींनी हडपल्याची तक्रार प्रशासनाकडे करून न्याय ...

Expressed anger towards the administration by pasting a picture of the Chief Minister | मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र चिकटवून प्रशासनाप्रति व्यक्त केला रोष

मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र चिकटवून प्रशासनाप्रति व्यक्त केला रोष

रिसोड तालुक्यातील अंचल येथील दिव्यांग शेतकरी बाबुराव वानखेडे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची शेतजमीन काहींनी हडपल्याची तक्रार प्रशासनाकडे करून न्याय देण्याची मागणी करीत आहेत. यासाठी ते वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहेत, परंतु त्याची दखल अद्याप घेण्यात आली नाही. त्यामुळे ते हताश झाले असून, त्यांनी वाशिम शहरातील विविध प्रशासकीय कार्यालयाबाहेर असलेल्या खांबांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र चिकटवून त्याखाली प्रशासनाचा नंगानाच बंद करा, असे वाक्य लिहिले आहे.

--------

ध्वजारोहणानंतर आत्मदहनाचा इशारा

गेल्या अनेक वर्षांपासून स्वत:ची शेतजमीन परत मिळविण्यासाठी शेतकरी बाबुराव वानखडे धडपडत असतानाही प्रशासन त्यांची दखल घेत नाही. त्यामुळे पालकमंत्री शंभुराज देसाई जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना सर्वच प्रमुख प्रशासकीय कार्यालयासमोर मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र चिकटवून पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासह १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: Expressed anger towards the administration by pasting a picture of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.