शहापुर येथील गावतलावाचे अस्तित्व लुप्त
By Admin | Updated: May 19, 2017 19:26 IST2017-05-19T19:26:26+5:302017-05-19T19:26:26+5:30
मंगरुळपीर: शहरालगत असलेल्या शहापुर येथील विस्तारीत गावतलाव सध्यास्थीतीत मनुष्य दाटवस्ती मुळे व अतीक्रमणामुळे लुप्त होत असल्याचे दिसुन येत आहे.

शहापुर येथील गावतलावाचे अस्तित्व लुप्त
ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर: शहरालगत असलेल्या शहापुर येथील विस्तारीत गावतलाव सध्यास्थीतीत मनुष्य दाटवस्ती मुळे व अतीक्रमणामुळे लुप्त होत असल्याचे दिसुन येत आहे.
शहरालगत असलेला शहापुर येथील या गावतलाव पाण्याने तुंडुब भरुन राहत असल्याने या भागातील हातपंपाना मुबलक पाणी होते, परंतु येथे कालातराने हळुहळु मनुष्यवस्ती वाढत गेली.याशिवाय सभोवताल अतिक्रमणाचा विळखा वाढत असल्याने हा गावतलावात वनस्पती वाढल्याने या गावतलावाचे अस्तित्व पुर्णता धोक्यात आले आहे.त्यामुळे या परिसरातील हातपंप हिवाळ्यातच कोरडे पडतात त्यामुळे या भागातील ग्रामस्थाना तीव्रपाणीटंचाईचा सामना करावा लागतो.आबाळवृध्दांना पाण्यासाठी भंटकती करावी लागते, ही बाब लक्षात घेऊन पाणीटंचाई वर मात करण्यासाठी या गावतलावाचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी लोकसहभाग व शासनाने पुढाकार घेतल्यास या भागात या गावतलावाच्या माध्यमातुन भुजल पातळी वाढण्यास हातभार परिणामी या भागातील हातपंप कोरडे पडणार नाही एवढेच नव्हे तर मंगरुळपीर शहरातील पाण्याच्या टाकीतील लाखो लीटर अशुध्द पाणी या तलावाजवळुन वाहते ते वाहुन जाणारे या तलावात वळविल्यास वर्षभर हा तलाव पाण्याने तुंडुब भरुन राहील ही महत्वपुर्ण बाब लक्षात घेऊन शासनाने या गावतलावाच्या खोलीकर रुंदीकरणाकडे लक्ष द्यावे अशी ग्रामस्थात केली जात आहे.