बचत गट साहित्याचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST2021-08-27T04:44:17+5:302021-08-27T04:44:17+5:30
कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक म्हणून गावच्या सरपंच सोनाली देशमुख ह्या होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी उपसरपंच ...

बचत गट साहित्याचे प्रदर्शन
कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक म्हणून गावच्या सरपंच सोनाली देशमुख ह्या होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी उपसरपंच प्रशांत देशमुख हे होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका अभियान व्यवस्थापक पवन आडे , तालुका व्यवस्थापक संतोष आघाव ,प्रभाग समन्वयक मनिषा कुडमेथे , माधुरी कांबळे, पुष्पा चव्हाण,बचत गटाच्या गावस्तरीय अध्यक्षा वंदना परांडे ,पोलीस पाटील वासुदेव सोनोने, कृषी सहायक अश्विनी सुरजुसे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक गोविंद पोतदार, रणजित जाधव, ग्रा. पं. सदस्य वर्षा देशमुख, चैताली परांडे, जयश्री देशमुख होत्या. तालुक्यातील सोमठाणा, कार्ली , तळप बु , बोरव्हा, कारखेडा येथील बचत गटांनी प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन वस्तू विक्रीस आणल्या होत्या. गावातील लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथम बक्षीस आधार दिव्यांग स्वयंम साह्यता बचत गट सोमठाणा यांना मिळाला. द्वितीय बक्षीस प्रगती स्वयंम साह्यता बचत गट सोमठाणा तर तृतीय बक्षीस शारदादेवी बचत गट कारखेडा यांना देण्यात आला . तर उत्तेजनार्थ बक्षीस महालक्ष्मी बचत गट कार्ली , जय अंबिका बचत गट बोरव्हा, गमाई बचत सोमठाणा, रमाई बचत गट तळप बु , राधिका बचत गट. कारखेडा, यांना देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष कांबळे यांनी केले तर रणजित जाधव यांनी आभार मानले.