स्वंयसहाय्यता समूह वस्तूची प्रदर्शनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST2021-09-05T04:47:01+5:302021-09-05T04:47:01+5:30

स्वस्तिक नगरात घाणीचे साम्राज्य कारंजा : कारंजा नगर परिषदकडून हद्दवाढ झालेल्या शहरातील विविध भागांसह स्वस्तिक ...

Exhibition of Self Help Group items | स्वंयसहाय्यता समूह वस्तूची प्रदर्शनी

स्वंयसहाय्यता समूह वस्तूची प्रदर्शनी

स्वस्तिक नगरात घाणीचे साम्राज्य

कारंजा : कारंजा नगर परिषदकडून हद्दवाढ झालेल्या शहरातील विविध भागांसह स्वस्तिक नगरांमध्ये घाणीचे साम्राज्य दिसून येते. त्यामुळे साचलेल्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट नगरपालिका प्रशासनाने न लावल्यामुळे परिसरात घाण निर्माण झाली आहे. याकडे नगरपालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील सेवानिवृत्त सरकारी वकील श्याम चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ३० ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनातून केली.

मोकाट गुरांचा बंदोबस्त करा

मंगरूळपीर : शहरात ठिकठिकाणी मोकाट गुरांचा ठिय्या आहे. तसेच मोकाट गुरे भररस्त्यावर बसने, रस्त्यावर वावरणे इत्यादी कारणांमुळे वाहतुकीस अडथळा येत असून किरकोळ अपघात घडत आहेत. तसेच शहरात घाण होत आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा पालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजप नगरसेवक अनिल गावंडे यांनी केली आहे.

अखेर खड्डा बुजविला

वाशिम : खामगाव जीन रस्त्यावरून जाताना रस्त्यात असलेला जीवघेणा खड्डा नगरपरिषदेतर्फे बुजविण्यात आला.

Web Title: Exhibition of Self Help Group items

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.