निधी खर्च करण्यासाठी कसरत
By Admin | Updated: February 11, 2015 00:56 IST2015-02-11T00:56:26+5:302015-02-11T00:56:26+5:30
वाशिम जिल्ह्यात पंचायत समिती स्तरावरील ५0 लाखावर निधी अखर्चित.

निधी खर्च करण्यासाठी कसरत
वाशिम : पंचायत समिती स्तरावरील विकासकामांना चालना मिळावी, याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने निधी देण्यात आला होता. जिल्ह्यातील पंचायत समित्या खर्च करण्यास अपयशी ठरल्याने शिल्लक निधी जिल्हा परिषदेमार्फत परत घेण्याचा ठराव झाला. हा निधी जिल्हा परिषदेला परत जाऊ नये, यासाठी कोणत्या गावात कोणती कामे करावयाची आहेत, याची माहिती पंचायत समिती स्तरावर घेणे सुरू झाले आहे. हे सर्व करताना एवढा मोठा निधी खर्च कसा करावा, यासाठी पंचायत समिती सभाप तींना मोठी कसरत करावी लागत आहे.
जिल्हा परिषदेने पंचायत समिती व ग्रामपंचायतींना दिलेला निधी पंचायत समिती स् तरावर पडून आहे. तो पंचायत समितीने खर्च केला नाही. हा निधी १५ मार्चपर्यंंंंत खर्च करायचा असल्याने पंचायत समिती स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. कोणत्या गावातील रस्त्यासह विकासकामे यामधून करण्यात येऊ शकतात, याची चाचपणी सुरू झाली आहे. हा निधी खर्च न झाल्यास सर्व पंचायत समिती सभापतींनी तो जिल्हा परिषदेकडे पुनर्नियोजनासाठी परत पाठवावा, असा ठराव काल झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. हा ठराव झाल्याबरोबर जिल्ह्यातील सभेला उपस्थित पंचायत समिती सभापतींनी सदर निधी कोणत्या कामांवर खर्च केला जाऊ शकतो, यासह इतर माहिती अधिकारी वर्गाकडून प्राप्त करून घेतली आहे. याबाबत तर वाशिम पंचायत समितीचे सभापती यांनी कालच सभेतच सदर निधी कोणत्या कोणत्या कामावर खर्च करायचा आहे, याची माहिती सभागृहातच मागि तली होती. यावर अधिकर्यांनी सर्व सभापतींनी याची माहिती लेखी स्वरूपात देण्याचे सांगितले होते. सभा आटोपल्याबरोबर काही सभापतींनी याबाबत माहिती जाणून आवश्यक कागदपत्रेही घेतले आहेत. आपल्या पंचायत समितीला प्राप्त निधी खर्च करण्याचा मानस बर्याच सभापतींनी व्यक्त केला असून, मोठय़ा प्रमाणात असलेला निधी कसा खर्च करावा, यासाठी कसरत सुरू झाली आहे. प्रत्येक पंचायत समितीला जिल्हा परिषदेकडून प्राप्त निधीमध्ये जवळपास वाशिम १९ लाख, मालेगाव ८.६७ लाख, रिसोड नऊ लाख, कारंजा १५.७६ लाख, मंगरूळपीर ७.१५ लाख रुपयांचा समावेश आहे.