मॉर्निंग वॉक ऐवजी घराच्या छतावरच व्यायामाला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST2021-05-26T04:40:57+5:302021-05-26T04:40:57+5:30
वाशिम शहरातील अकाेला रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, लाखाळा परिसर, काटा रस्त्यावर अनेक जण पहाटे माॅर्निंग वाॅकसाठी जायचे. लाेकमतच्या ...

मॉर्निंग वॉक ऐवजी घराच्या छतावरच व्यायामाला प्राधान्य
वाशिम शहरातील अकाेला रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, लाखाळा परिसर, काटा रस्त्यावर अनेक जण पहाटे माॅर्निंग वाॅकसाठी जायचे. लाेकमतच्या वतीने २५ मे राेजी पहाटे पाहणी केली असता एक दाेन सायकलस्वारी करणाऱ्या व्यतिरिक्त काेणीही दिसून आले नाही. याकरिता नियमित माॅर्निंग वाॅकसाठी जाणाऱ्यांना विचारणा केली असता काेराेना संसर्ग असतांना घराच्या छतावरच व्यायाम करीत असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी नागरिक पहाटे कुणीच नसते म्हणून पाेलिसांची नजर चुकवून फिरण्यासाठी जात हाेते. पाेलिसांनी कडक ताकीद दिल्याने हा प्रकार बंद झाल्याने माॅर्निंग वाॅकचे रस्ते निर्मनुष्य दिसून येत आहेत. माॅर्निंग वाॅक बंद झाले असले तरी आपल्या आराेग्याची काळजी म्हणून नागरिक घराच्या छतावर व्यायाम करून आपले आराेग्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
----------------
माॅर्निंग वाॅक करणाऱ्यांवर पाेलिसांचा वाॅच
वाढता काेराेना संसर्ग पाहता कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये माॅर्निंग वाॅक जाणाऱ्यांवरही राेख लावण्यात आला आहे. सुरुवातीला नियमांचे उल्लंघन करीत काहीजण माॅर्निंग वाॅक करताना आढळून आले हाेते. पाेलिसांनी त्यांना चांगलाच दम भरल्याने व सद्यस्थितीतही पाेलिसांचा वाॅच असल्याने माॅर्निंग वाॅक हाेणारी रस्ते, बगिचा या स्थळांवर शुकशुकाट दिसून येत आहे. जिल्हा क्रीडा संकुलावर माेठ्या प्रमाणात दरराेज गर्दी व्हायची, परंतु प्रशासनाने संकुलाला कुलूप लावलेले दिसून आले.
-॰---------------
माॅर्निंग वाॅक बंद ; व्यायाम सुरू
काेराेना संसर्ग पाहता घरीच कुटुंबासाेबत याेगा करून आपले व शहरवासीयांचे आराेग्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. छतावरही फिरून आपले आराेग्य अबाधित ठेवता येते.
दीपा वानखडे, वाशिम
गत दहा वर्षांपासून दरराेज न चुकता माॅर्निंग वाॅकची सवय आहे. काेराेना संसर्ग पाहता यात खंड पडला आहे. तरी सुद्धा घराच्या छतावर जवळपास अर्धातास फिरून वाॅक सुरूच आहे.
बाळू भाेयर, वाशिम
--------
माॅर्निंग वाॅकची स्थळे निर्मनुष्य
शहरातील माॅर्निग वाॅक करण्यात येत असलेली रस्ते निर्मन्युष्य दिसून येत आहेत. २५ मे राेजी पहाटे लाेकमततर्फे या स्थळाची पाहणी केली असता काेणीही माॅर्निंग वाॅकसाठी घराबाहेर निघाल्याचे दिसून आले नाही.