राजस्थान महाविद्यालयात तृतीय पदवी दान समारंभ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:28 IST2021-07-20T04:28:13+5:302021-07-20T04:28:13+5:30
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलनकुमार संचेती होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक प्रा. डॉ. रविप्रकाश चापके (पुसद), ...

राजस्थान महाविद्यालयात तृतीय पदवी दान समारंभ उत्साहात
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलनकुमार संचेती होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक प्रा. डॉ. रविप्रकाश चापके (पुसद), तसेच गोवर्धन मोहिते यांची उपस्थिती होती. दोन्ही वक्त्यांनी आजच्या परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आर्ट्स, काॅमर्स, विज्ञान व बीसीएच्या जवळपास पन्नास विद्यार्थ्यांना कोरोनाचे नियम पाळून मान्यवरांचे हस्ते पदवी वितरण करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली कुमरे यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय पदवी वितरण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विजय जाधव यांनी, तर आभार प्रदर्शन गोपाल गवळी यांनी केले. यावेळी समिती मधील प्रा. स्वप्नील काळबांडे, प्रा. खारोडे, आदी सदस्यांची उपस्थिती होती. तसेच प्रा. ज्योत्स्ना पाटील, डॉ. राजेश मस्के, डॉ. विपीन राठोड, प्रा. दिनेश इंगळे, प्रा. प्रमोद धनविजय, डॉ. अनिल बनसोड, वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष राठी, सचिव राजेंद्र सोमाणी, प्राचार्य डॉ. मिलनकुमार संचेती यांनी मार्गदर्शन केले..