खोदकाम अवैध; चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:38 IST2021-04-19T04:38:44+5:302021-04-19T04:38:44+5:30

०००० रस्ता खडीकरणाबाबत निवेदन वाशिम : मुंगळा- वारंगी या रस्त्याचे खडीकरण करण्याची मागणी गावकऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांनी बांधकाम विभागाकडे गुरुवारी ...

Excavation illegal; Inquiry demanded | खोदकाम अवैध; चौकशीची मागणी

खोदकाम अवैध; चौकशीची मागणी

००००

रस्ता खडीकरणाबाबत निवेदन

वाशिम : मुंगळा- वारंगी या रस्त्याचे खडीकरण करण्याची मागणी गावकऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांनी बांधकाम विभागाकडे गुरुवारी केली. या रस्त्याचे मातीकाम पूर्ण झाले आहे. मात्र, खडीकरण व डांबरीकरण कामाला अद्याप सुरुवात झाली नाही. त्यामुळे वाहनचालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

००००

विहीर अधिग्रहणाबाबत चाचणी

वाशिम : ग्रामीण भागात पाणीटंचाईची चाहूल लागली असून, पाणीटंचाई निवारणार्थ विहीर अधिग्रहण केले जाणार आहे. यासाठी पंचायत समिती चमूतर्फे चाचणी केली जात असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शनिवारी स्पष्ट केले.

००००

चिखली येथे १३ कोरोना रुग्ण

वाशिम : रिसोड तालुक्यातील चिखली येथील १३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १८ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची आरोग्य विभागाने तपासणी केली.

Web Title: Excavation illegal; Inquiry demanded