माजी सैनिकांच्या पाल्यांना मिळणार शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:44 IST2021-09-18T04:44:41+5:302021-09-18T04:44:41+5:30

इयत्ता दहावी, बारावी, पदविका व पदवी परीक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, सध्या शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, केंद्र व राज्य शासनाची ...

Ex-servicemen's children will get scholarships | माजी सैनिकांच्या पाल्यांना मिळणार शिष्यवृत्ती

माजी सैनिकांच्या पाल्यांना मिळणार शिष्यवृत्ती

इयत्ता दहावी, बारावी, पदविका व पदवी परीक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, सध्या शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, केंद्र व राज्य शासनाची इतर शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा शाळा, महाविद्यालयाचा, संस्थेच्या प्राचार्याचा दाखला, ज्या पाल्यांनी सीईटी, जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे अशा पाल्यांना प्रकरणासोबत गॅप सर्टिफिकेट (स्वयंघोषणापत्र) घेऊन शिष्यवृत्तीची मंजुरी घ्यावी. माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे असलेल्या पानाची व रेशनकार्डची साक्षांकित प्रत, मुलीचे वय १८ वर्षेपेक्षा जास्त असल्यास ती अविवाहित असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला, अर्थिक मदतीच्या पिवळ्या कार्डची छायांकित प्रत (दोन्ही बाजू), राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधार कार्डची छायांकित प्रत आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

Web Title: Ex-servicemen's children will get scholarships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.