महामार्गावरील प्रत्येक चौकात गतिरोधक हवे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST2021-02-05T09:26:07+5:302021-02-05T09:26:07+5:30
वाशिम जिल्ह्यात अकोला-हिंगोली, मालेगाव-मेहकर, हे राष्ट्रीय महामार्ग प्रगतीपथावर आहेत, तर अकोेला-आर्णी आणि हिंगोली-यवतमाळ या महामार्गाचे जिल्ह्यातील काम जवळपास पूर्णत्वास ...

महामार्गावरील प्रत्येक चौकात गतिरोधक हवे !
वाशिम जिल्ह्यात अकोला-हिंगोली, मालेगाव-मेहकर, हे राष्ट्रीय महामार्ग प्रगतीपथावर आहेत, तर अकोेला-आर्णी आणि हिंगोली-यवतमाळ या महामार्गाचे जिल्ह्यातील काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. पूर्णत्वास आलेल्या मार्गावर वाहने सुसाट वेगात धावत आहेत. तथापि, या मार्गावर शहरांतील वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक नाहीत, तसेच सहा महिन्यांपूर्वी पथदिव्यांचे खांब उभारल्यानंतरही आजवर दिवे सुरू करण्यात आले नाहीत. या प्रकारामुळे महामार्गावर अपघात घडण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. त्यामुळे या महामार्गांवर प्रत्येक चौकात गतिरोधक बसवावे आणि पथदिवे सुरू करावे, अशी मागणी मित्र फाउंडेशनकडून गृहराज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी मित्र फाउंडेशन सदस्य आदित्य मिसाळ, कपिल सोळंके, विलास मांढरे, सुनील साठे, सुयोग चोपडे, रोहन काळे, राहुल देशमुख, अनूप इंगळे उपस्थित होते.