यंदाही उन्हाळी शिबिरे प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:42 IST2021-05-18T04:42:58+5:302021-05-18T04:42:58+5:30
०००००० पदोन्नती कोट्यातील ३३ टक्के पदे भरा ! वाशिम : भारतीय संविधानाच्या कलम १६ मधील तरतुदीनुसार २५ एप्रिल २००४ ...

यंदाही उन्हाळी शिबिरे प्रभावित
००००००
पदोन्नती कोट्यातील ३३ टक्के पदे भरा !
वाशिम : भारतीय संविधानाच्या कलम १६ मधील तरतुदीनुसार २५ एप्रिल २००४ रोजी निर्गमित शासन आदेशानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील ३३ टक्के आरक्षित पदे मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांनाच पदोन्नती देऊन भरण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी सोमवारी केली.
०००००
शेलू बाजार येथे आणखी तीन रुग्ण
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथे आणखी तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल १७ मे रोजी पॉझिटिव्ह आल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना बाधितांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती संकलित करण्याला सुरूवात केली.
००००००००
वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण
वाशिम : वाशिम व कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण झाले असून, अतिक्रमण अद्याप हटविण्यात आले नाही. खरिपाची पेरणी करण्यापूर्वी अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी सोमवारी केली.