हिवरा लाहे येथे राष्ट्रसंत युवक विचारमंचची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:13+5:302021-02-05T09:22:13+5:30
---------- ९ कोटी मंजूर होऊनही रस्त्याचे काम ठप्प! धनज बु.: कारंजा तालुक्यातील धनज बु.-कारंजा या १७ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची ...

हिवरा लाहे येथे राष्ट्रसंत युवक विचारमंचची स्थापना
----------
९ कोटी मंजूर होऊनही रस्त्याचे काम ठप्प!
धनज बु.: कारंजा तालुक्यातील धनज बु.-कारंजा या १७ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. आमदार राजेंद्र पाटणी यांनी पाठपुरावा करून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरींकडून ९ कोटी रुपये मंजूरही करून घेतले; परंतु अद्यापही या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
--------------
सुरळीत वीज पुरवठ्यासाठी प्रहार संघटना आक्रमक
धनज बु.: येथील वीज उपकेंद्रांतर्गत राहाटी फिडरवरील कृषी पंपाचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिके संकटात सापडत आहेत. त्यामुळे शेतकरी वैतागले असून, ही समस्या दूर करण्यासाठी प्रहार संघटनेकडून शु्क्रवारी महावितरणच्या कारंजा उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. -------