कारंजालाड तालुक्यात ९४ ठिकाणी गणेशाची स्थापना

By Admin | Updated: September 4, 2014 22:55 IST2014-09-04T22:55:28+5:302014-09-04T22:55:28+5:30

विघ्नहर्त्या गणरायाची कारंजालाड तालुक्यात ९४ ठिकाणी स्थापना; ४0 गावात ‘एक गाव, एक गणपती’.

Establishment of Ganesha at 94 places in Karanjalad taluka | कारंजालाड तालुक्यात ९४ ठिकाणी गणेशाची स्थापना

कारंजालाड तालुक्यात ९४ ठिकाणी गणेशाची स्थापना

कारंजालाड : विघ्नहर्त्या गणरायाची तालुक्यात ९४ ठिकाणी स्थापना करण्यात आली. ज्यामध्ये ४0 गावात ह्यएक गाव एक गणपतीह्ण चा समावेश आहे.
कारंजा शहरात ४0 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत तर ग्रामीण भागात ५४ सार्वजनिक गणेश मंडळ आहे. या मंडळाची २९ ऑगस्ट रोजी गणपतीची स्थापना केली असून, दररोज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे. सोमवारला अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातून विसर्जन मिरवणूक निघणार असून त्यामध्ये २0 गणपती मंडळाचा सहभाग असणार आहे. दरम्यान, गणेशोत्सव उत्साहात व शांततेने पार पडावा याकरिता पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एसआरपीची एक तुकडी, ११ विशेष पोलीस अधिकारी, १५0 कर्मचारी, ५५ होमगार्ड यांसह इतर कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. पोलिसदलाच्या वतीने गणेश विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Web Title: Establishment of Ganesha at 94 places in Karanjalad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.