दुर्गेची स्थापना
By Admin | Updated: September 26, 2014 00:42 IST2014-09-26T00:42:02+5:302014-09-26T00:42:02+5:30
वाशिम जिल्ह्यात ३७४ ठिकाणी सार्वजनीक नवदूर्गा मंडळांनी तर ९ ठिकाणी शारदादेवीची स्थापना.

दुर्गेची स्थापना
वाशिम : पावित्र्य , मांगल्य अन् उत्साहाचे प्रतिक असलेल्या दूर्गोत्सवासह शारदोत्सवास गुरूवारी देवीच्या मुर्ती स्थापन क रून सुरुवात झाली. ढोलताशांच्या निनादात मॉ दुर्गांचे जिल्ह्यात आगमन झाले असून, पुढील आठ दिवसांसाठी देवीचा जिल्ह्यात मुक्काम राहणार आहे. सोबतच युवक-युवतींमध्ये खास आकर्षण असलेल्या दांडीयाची या दिवसांमध्ये धूम राहणार आहे.
जिल्ह्यात शहर व खेडेगाव मिळून तब्बल ३७४ ठिकाणी सार्वजनीक नवदूर्गा मंडळांनी तर ९ ठिकाणी शारदादेवीची विधिवत पुजा अर्चा करुन स्थापना केली. सायंकाळपर्यंत दूर्गोत्सवाच्या स्थापनेचे काम विविध ठिकाणी सुरु होते. जिल्ह्यातील सर्व नवदूर्गा मंडळांनी यावर्षीच्या नवदूर्गाउत्सवाला जनप्रबोधनाचे प्रभावी माध्यम करण्याचे ठरविले आहे.