पर्यावरण संतुलन व वृक्ष संवर्धन काळाची गरज
By Admin | Updated: September 22, 2014 01:43 IST2014-09-22T01:42:25+5:302014-09-22T01:43:03+5:30
अवैध वृक्षतोडीवर चिंता : लोकमत परिचर्चेतील सुर

पर्यावरण संतुलन व वृक्ष संवर्धन काळाची गरज
शिखरचंद बागरेचा / वाशिम
मानवाच्या लहरीपणामुळे भुतलावरील पर्यावरणाचा असमतोल वाढत आहे. एकीकडे लोकसंख्येत झपाट्याने वाढत होत आहे. तर दुसरीकडे वृक्षांची कत्तल सुद्धा मोठय़ा प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन अबाधित राखण्यासाठी वृक्षसंपदेचे संवर्धन करण्याची नितांत गरज आहे, असा सूर ह्यलोकमतह्णच्यावतीने २१ सप्टेंबर रोजी ह्यपर्यावरण संतुलन व वृक्षसंवर्धनह्ण या विषयावर आयोजित परिचर्चेत मान्यवरांनी आवळला. स्थानिक ह्यलोकमतह्ण जिल्हा कार्यालयात सदर परिचर्चा आयोजित केली होती. या परिचर्चेत शहरातील वृक्षप्रेमी प्रा. सुधाकर देशपांडे, हरित सेनेचे प्रभारी शिक्षक अभिजित जोशी, शिवाजी ज्ञानपीठचे मुख्याध्यापक दिलीप जोशी, वृक्ष प्रेमी रामकिसन शिंदे, व्यवसायी प्रकाश मोदानी, अभियंता जिवन इंगळे व विद्यार्थिनी भक्ती मोदानी आदिंचा सहभाग होता. पर्यावरण संतुलन म्हणजे काय व ते अबाधित राहण्यासाठी काय करावे याबाबत ह्यपर्यावरण संतुलन व वृक्ष संवर्धनह्ण या विषयावर ही परिचर्चा घेण्यात आली. मानवाने गरजा भागविण्यासाठी वृक्षांची कत्तल करुन निसर्ग सृष्टीचा वाटेल तसा वापर सुरु केला. परिणामी, पर्यावरण संतुलन बिघडत आहे. ऋतुमानाचे चक्र बदलत चालले आहे. मानवाने यावर वेळीच पावले उचलली नाही तर भविष्यात याचे गंभीर परिणाम मानवजातीला भोगावे लागणार आहे, अशी भितीही या परिचर्चेत मान्यवरांनी व्यक्त केली.