उद्यापासून पाच दिवस संपूर्ण शेलूबाजार कन्टेनमेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:41 IST2021-03-19T04:41:29+5:302021-03-19T04:41:29+5:30
शेलूबाजार येथे वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी प्रकाश मुळे यांनी ग्राम पंचायत कार्यालयात १८ मार्च रोजी ...

उद्यापासून पाच दिवस संपूर्ण शेलूबाजार कन्टेनमेंट झोन
शेलूबाजार येथे वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी प्रकाश मुळे यांनी ग्राम पंचायत कार्यालयात १८ मार्च रोजी बैठक घेतली. शेलूबाजार येथे व्यापारी व कामगाराच्या केलेल्या चाचणीत ४८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी व ग्रामीण भागात परिणाम होवू नये म्हणून बाजारपेठ ५ दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा झाली आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ अरविंद भगत, ग्रामविकास अधिकारी दिपा सुर्वे, मंडळ अधिकारी दिलीप चौधरी, मनवर, तलाठी उल्हास पांडे, ग्राम पंचायत पदाधिकारी काही व्यापारी उपस्थित होते. या चर्चेनुसार उपविभागीय अधिकाºयांनी सायंकाळी आदेश पारित करीत शेलूबाजार गावच्या चारही सीमा, सर्व रस्ते परिसरात जनतेला फिरण्यास बंदी घातली. दरम्यान, नागपूर-औरंगाबाद आणि अकोला-मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक सुरू राहणार असून, या मार्गावर कोणतेही वाहन थांबविण्यास मनाईसुद्धा करण्यात आली आहे.