२७ ग्राम पंचायतीसाठी उत्साहात मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:45 IST2021-01-16T04:45:20+5:302021-01-16T04:45:20+5:30
कारंजा लाड: तालुक्यातील २७ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार धीरज मांजरे यांच्या ...

२७ ग्राम पंचायतीसाठी उत्साहात मतदान
कारंजा लाड: तालुक्यातील २७ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात ७५ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसील विभागाकडून देण्यात आली.
तालुक्यातील २८ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला होता. त्यात मुरंबी ग्राम पंचायत अविरोध झाल्यामुळे २७ ग्राम पंचायतीच्या ९० प्रभागासाठी ४९४ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. यामध्ये बेंबळा, कामरगाव, खेर्डा बु. भडशिवनी, शिवनगर, माळेगाव, हिंगणवाडी, सिरसोली, राहटी,मेहा, भामदेवी, लाडेगाव,पिंप्री मोडक, मोहगव्हान, शेवती, शेलु बु. कोळी, उबंर्डा बाजार, कार्ली, येवता, धामणी खडी, सोहळ, गायवळ, पिंपळगाव खु., सोमठाणा, रामनगर, दुधोरा या गावात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. २७ ग्राम पंचायत मध्ये ७५ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसील विभागाकडून माहीती देण्यात आली.