राठी विधि महाविद्यालयात अतिथी व्याख्यान उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST2021-03-21T04:40:33+5:302021-03-21T04:40:33+5:30
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) एस.एम. बोहरा उपस्थित होते. त्यांनी कायदेविषयक मार्गदर्शन ...

राठी विधि महाविद्यालयात अतिथी व्याख्यान उत्साहात
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) एस.एम. बोहरा उपस्थित होते. त्यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करताना भारतीय दंड प्रक्रिया संहितामधील जामिनाच्या विविध तरतुदींविषयी मार्गदर्शन केले. जामीन म्हणजे काय, जामीनपात्र व अजामीनपात्र गुन्ह्यामध्ये जामीन केव्हा मिळू शकतो. तसेच अटकपूर्व जमानत केव्हा मागता येते व ती कोणत्या आधारावर मिळू शकते. दिलेली जमानत केव्हा रद्द होऊ शकते, आदींबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
विधि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत चिमणे म्हणाले, काही प्रकरणांमध्ये जामीन मिळविणे हा अटक झालेल्या व्यक्तीचा अधिकार जरी असला तरी न्यायालयापुुढे जामिनाबाबत आपली बाजू मांडताना नवीन वकिलांनी कायद्याचा पुरेपूर अभ्यास, भाषेचे कौशल्य, वागणे याही गोष्टी शिकल्या पाहिजेत. जामिनाबाबत प्लेटो व सॉक्रेटीसचे उदाहरण देताना विधिचे ज्ञान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास करून वकील म्हणून व्यक्तिमत्त्व घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन व संचालन प्रा. डॉ. सागर सोनी यांनी केले. प्रा. संजय इढोळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. भाग्यश्री धुमाळे, महादेव सोमाणी, मदन पवार, जितेंद्र अग्रवाल यांनी पुढाकार घेतला.