इंझा येथील हिरकणीने केली दारुबंदी
By Admin | Updated: September 30, 2014 01:33 IST2014-09-30T01:33:12+5:302014-09-30T01:33:12+5:30
सूचिता सोळंके यांचा धाडसी उपक्रम

इंझा येथील हिरकणीने केली दारुबंदी
कारंजा लाड (वाशिम) : पारधी समाजाचा मुख्य व्यवसाय जंगलातील पक्ष्यांची शिकार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, त्यामुळे हा समाज शिक्षणापासून कोसो दूर आहे. त्यामुळे पारधी समाजा तील शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यातच या समाजाच्या महिला असो की पुरुष सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात पुढाकार घेणार्यांची संख्या नगण्य आहे. यातच पारधी समाजातील सातवा वर्ग शिकलेल्या सूचिता सोळंके यांनी गावात पारधी तांड्यात स्वखर्चाने व लोकसहभागातून अंगणवाडी सुरू केली. त्याबरोबर सामाजिक उपक्रम राबवित गावातील महिला एकत्र करून गावात सुरू असणार्या अवैध दारूविरुद्ध बंड पुकारून गावातील दारू बंद केली.
कारंजा तालुक्यातील इंझा येथील छोट्याशा गावात राहणार्या सूचिता सोळंके यांनी सामाजिक उ पक्रमातून राजकारणात प्रवेश केला. अन् ग्रा.पं. निवडणुकीत डिसेंबर २0१२ रोजी विजयी होऊन इंझा ग्रा.पं.च्या सरपंचपदी सरपंच म्हणून कार्यरत आहे. या कार्यामुळे सहय़ाद्री दूरदर्शन वाहिनीने तिला हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित केले. सन २0१0 या वर्षात सुरू केलेली अंगणवाडी पारधी तांड्या तील मुलांसाठी आजही सुरू आहे.