वाढलेल्या सिंचन क्षमतेचा पुरेपूर वापर व्हावा
By Admin | Updated: March 18, 2015 01:56 IST2015-03-18T01:56:14+5:302015-03-18T01:56:14+5:30
‘आत्मा’नियामक मंडळ बैठकीत वाशिम जिल्हाधिका-यांनी दिल्या सूचना.

वाढलेल्या सिंचन क्षमतेचा पुरेपूर वापर व्हावा
वाशिम : नरेगाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे पाच हजार नवीन विहिरी खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिंचन क्षमतेत वाढ झाली असून, त्याचा पुरेपूर वापर होण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी विभाग व आत्माने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी आत्मा नियामक मंडळाच्या बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, आत्माचे प्रकल्प संचालक विजय चवाळे, प्रकल्प उपसंचालक ए. जी. वाघमारे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूयर्वंशी, विभागीय कृषी अधिकारी इंगळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी कुलकर्णी म्हणाले की, जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीचे क्षेत्न वाढवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी मित्न व संबंधित अधिकार्यांनी शेतकर्यांशी चर्चा करून त्यांना पेरणीसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे; तसेच आगामी खरीप हंगामात सोयाबीन पिकाला पर्याय देण्यासाठी ज्वारीची जास्तीत जास्त पेरणी करण्याबाबत शेतकर्यांमध्ये जागृती करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी दिल्या. यावेळी जिल्हय़ाचा यथार्थ कृषी विस्तार आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करण्या त आली. हा आराखडा तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या कार्यपद्धतीची माहिती आ त्माचे प्रकल्प संचालक चवाळे यांनी उपस्थितांना दिली. कृषी विस्तार आराखडा बनविला जात असताना जास्तीत जास्त बिनचूक माहितीची नोंद घेण्याची सूचना जिल्हाधिकार्यांनी यावेळी केली.