समाजकार्य महाविद्यालयात इंग्रजी भाषा मंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:39 IST2021-02-12T04:39:33+5:302021-02-12T04:39:33+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य किशोर वाहाने, तर प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्रा. मंगेश भुताडे व प्रा. आर. एस. जाधव ...

समाजकार्य महाविद्यालयात इंग्रजी भाषा मंडळ
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य किशोर वाहाने, तर प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्रा. मंगेश भुताडे व प्रा. आर. एस. जाधव उपस्थित होते. आयोजक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. गजानन हिवसे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा डॉ. संजय साळीवकर, प्रा. गजानन बारड व प्रा. प्रसेनजित चिखलीकर होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. हिवसे यांनी इंग्रजी भाषा मंडळाचे स्वरूप व कार्य समजावून सांगितले. प्रा. मंगेश भुताडे यांनी इंग्रजी भाषेचे समाजकार्यात काय महत्व आहे. हे विविध उदाहरणासह स्पष्ट केले. प्रा. आर. एस. जाधव यांनी इंग्रजी बोलायला शिकण्याच्या सोप्या पद्धती सांगून इंग्रजी शब्दसाठा कसा वाढवावा हे सुद्धा स्पष्ट केले. प्रा डॉ संजय साळीवकर यांनी इंग्रजी बोलण्यासाठी तसे वातावरण तयार करण्याचे आवाहन केले, तर प्रा. बारड यांनी इंग्रजी व मराठी दोनही भाषा ससा व कासवाप्रमाणे असून, त्यांनी एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांना सोबत घेऊन चालल्यास फायदा होईल असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. वाहाने यांनी आपण चुकांमधूनच शिकत असतो असे सांगून इंग्रजी भाषेकडे समस्या म्हणून न पाहता ज्ञानाची व संधीची भाषा म्हणून पाहावे असे प्रतिपादन केले.