शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी महाविद्यालये अद्याप बंदच, अर्थचक्र बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:44 IST

प्राप्त माहितीनुसार, शासनाने ओबीसी व व्हीजेएनटी या घटकातील विद्यार्थ्यांना देय असलेली २०१७-१८ ची शिष्यवृत्ती अद्याप अदा केलेली नाही. २०१८-१९ ...

प्राप्त माहितीनुसार, शासनाने ओबीसी व व्हीजेएनटी या घटकातील विद्यार्थ्यांना देय असलेली २०१७-१८ ची शिष्यवृत्ती अद्याप अदा केलेली नाही. २०१८-१९ पासून महाडीबीटी पोर्टल सुरू झाले. त्यातही अडचणी असल्याने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित राहिली. यासह २०१९-२० ची ५० टक्क्यांपेक्षा अधिक शिष्यवृत्तीची रक्कमही मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांकडून येणारे जवळपास ६० लाख रुपये थकीत असल्याची माहिती सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अ‍ॅड. वैशाली वालचाळे यांनी दिली. या आर्थिक संकटामुळे महाविद्यालयाचे अर्थचक्र पूर्णत: बिघडले असून, शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

...................

महाविद्यालयांची संख्या

०१

शासकीय तंत्रनिकेतन

०१

अभियांत्रिकी महाविद्यालय

...........

५५० विद्यार्थी क्षमता

५५

प्राध्यापकांची संख्या

२०

शिक्षकेतर कर्मचारी संख्या

.....................................

पगारासाठी बँकेकडून घेतले कर्ज

जिल्ह्यातील एकमेव विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयात ५५ शिक्षक व २० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना कुठलेही शुल्क मागायचे नाही आणि शिष्यवृत्तीची थकीत रक्कमही अदा करायची नाही, या शासनाच्या धोरणामुळे हे महाविद्यालयही अडचणीत सापडले आहे. यंदा तर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी बँकेकडून कर्ज घ्यावे लागले, अशी माहिती प्रा. नीरज वालचाळे यांनी दिली.

...........................................

कोट :

सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय हे पूर्णत: विनाअनुदानित असल्याने विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या शुल्कातूनच इतर खर्चासह पगार भागविले जातात. असे असताना २०१७-१८ पासून शासनाकडे शिष्यवृत्तीची रक्कम प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांचे शुल्क जमा झालेले नाही. अशा स्थितीत महाविद्यालय प्रशासनाने बँकेकडून कर्ज घेऊन काही प्रमाणात पगार दिल्याने दिलासा मिळाला आहे.

- सचिन व्यवहारे

संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख