कार अपघातात अभियंता जखमी
By Admin | Updated: June 2, 2014 01:11 IST2014-06-02T01:00:53+5:302014-06-02T01:11:00+5:30
कार अपघातात वाशिम जिल्हा परिषदच्या लघुसिंचन विभागातील अभियंता जखमी.

कार अपघातात अभियंता जखमी
कारंजा : यवतमाळ येथून कारंजाकडे येत असताना झालेल्या कार अपघातात वाशिम जिल्हा परिषदच्या लघुसिंचन विभागातील अभियंता जखमी झाल्याची घटना आज (दि.१) रोजी रात्री ७.३0 च्या सुमारास दारव्हा तालुक्यातील बोदेगावजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार विना नंबर असलेली आय आठ ही कार यवतमाळहून कारंजाकडे येत असताना चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले व कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात अभियंता राजेश कोठेकर वय अंदाजे ४५ वर्ष हे जखमी झाले. दरम्यान, त्यांना बोदेगाव येथील राजेश चव्हाण, श्यामसुंदर जयस्वाल व महेश राठोड यांनी ऑटोत टाकून येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ भरती केले.