..अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी ठाकरे

By Admin | Updated: September 3, 2016 02:00 IST2016-09-03T02:00:55+5:302016-09-03T02:00:55+5:30

वाशिम जिल्हाध्यक्षपदाची माळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या गळय़ात पडली.

At the end, Thackeray was the district president of NCP | ..अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी ठाकरे

..अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी ठाकरे

वाशिम, दि. २ : जवळपास गत दोन वर्षांंपासून जिल्हाध्यक्षच नसणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना धुरा सांभाळताना मोठी कसरत करावी लागत असताना २ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाशिम जिल्हाध्यक्षपदाची माळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या गळय़ात पडली.
येत्या नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्हाध्यक्षच नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांंसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. यासंदर्भात २७ ऑगस्ट रोजी नागपूर तर ३0 ऑगस्ट रोजी मुंबई येथे बैठकी झाल्यात. ३0 ऑगस्ट रोजी जिल्हाध्यक्षपदाची निवड निश्‍चित असतानाच इच्छुकांची गर्दी पाहता निर्णय थांबविण्यात आला. त्यानंतर झालेल्या चर्चेतूनच ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, अजितदादा पवार व पक्षङ्म्रेष्ठींनी २ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली.
यासंदर्भात चंद्रकांत ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षाने टाकलेली जबाबदारी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांंना सोबत घेऊन पक्षवाढीवर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत सुनील पाटील दहात्रे होते. चंद्रकांत दादा ठाकरे यांची निवड झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, आम्ही दादांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: At the end, Thackeray was the district president of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.