मानोरा तहसील परिसरातील अतिक्रमण हटविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 19:28 IST2017-10-01T19:27:05+5:302017-10-01T19:28:20+5:30
मानोरा: स्थानिक तहसील कार्यालय व तहसीलदार निवासस्थानासमोर २९ सप्टेंबरला अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली.

मानोरा तहसील परिसरातील अतिक्रमण हटविले!
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा: स्थानिक तहसील कार्यालय व तहसीलदार निवासस्थानासमोर २९ सप्टेंबरला अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली.
मानोरा तहसील परिसरात अनेक वर्षांपासून लघुव्यावसायिकांकडून अतिक्रमण करून दुकाने थाटण्यात आली होती. यापूर्वी संबंधितांना नोटिस बजावण्यात आल्या; परंतू त्याचा विशेष फायदा झाला नाही. त्यामुळे अखेर २९ सप्टेंबरला अतिक्रमण हटाव मोहिम राबवून दुकाने हटविण्यात आली. त्यामुळे रहदारीस जाणवणारा अडथळा दूर होण्यासोबतच तहसील कार्यालयाचा परिसर चकाचक झाल्याचे पाहावयास मिळत आहे. तथापि, या परिसरात पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी तार कुंपण घालणे आवश्यक असल्याचा सूर जनतेतून उमटत आहे.