कारंजा शहराला अतिक्रमणाचा विळखा
By Admin | Updated: September 26, 2014 23:38 IST2014-09-26T23:38:33+5:302014-09-26T23:38:33+5:30
सामाजिक स्वास्थ्य धोक्यात : नगर परिषदेने पुढाकार घेण्याची गरज.

कारंजा शहराला अतिक्रमणाचा विळखा
कारंजालाड (वाशिम) : संबंध कारंजा शहराभोवती अतिक्रमणाचा घट्ट विळखा बसला असून, प्रशासकीय यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. प्रशासकीय यंत्रणा अतिक्रमण हटविण्याबद्दल उदासीन राहिल्यास सर्व शासकीय व नगर परिषदेच्या अखत्यारीतील जमिन अतिक्रमणाच्या दाढेत गायब होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कारंजा शहराला लागून खेर्डा, कोळी, किन्ही राजा, तुळजापूर अशा ग्रामपंचायतीची हद्द आहे. शहराच्या पूर्वेस व दक्षिणेस खेर्डा ग्रामपंचायत दक्षिणेच्या काही भागात किन्ही ग्रामपंचायत, काळी खेर्डा, पश्चिमेस तुळजापूर, उत्तरेस ग्रामपंचायत शहा या शहराला लागून असणार्या ग्रामपंचायत जमिनीवर कुणाचेही नियंत्रण नाही. या शहराच्या सभोवताल एक हजार रूपये फुटाचे प्लॉटचे भाव आहे व त्याच परिसरात अतिक्रमण केल्यास मोफत जागा. कुष्ठरोगाचा दवाखाना देखील अतिक्रमणाच्या कर्करोगापासून वेगळा राहू शकला नाही. पंचायत समिती ते म.ब्र.आश्रम असंख्य अतिक्रमण झाली आहेत. विद्याभारती महाविद्यालय ते धाबेकर महाविद्यालयाच्या मागे संपूर्ण परिसरात अतिक्रमण धारकांनी झोपड्या बांधल्या आहेत. कुष्ठरोगाच्या दवाखान्याच्या पायथ्याशी, बाजूला सगळी अतिक्रमणच झाली आहे. कारंजा शहराची प्राचीन संस्कृती व परंपरा जपणारा सारंग तलाव या तलावाच्या पात्रात अतिक्रमण झालीत. ती उठावित यासाठी तहसीलदार कारंजा व माजी नगर परिषद मुख्याधिकारी गीता वंजारी यांनी खूप प्रयत्न केलेत पण ही अतिक्रमणे स्त्रियांनी केली आहे. महिलांच्या नावावर अतिक्रमण आहेत आणि या महिला सरळ प्रशासकीय यंत्रणेलाच आवाहन केलेय जातीवाचक व विनयभंगाच्या प्रकरणात अडकविण्याचे त्यामुळे अतिक्रमण हटविण्यसाठी महिला मागासवर्गीय अधिकार्याची गरज आहे.