शासकीय कार्यालयांतील सॅनिटायझरच्या बाॅटल रिकाम्या; मास्कचा वापरही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:43+5:302021-02-05T09:27:43+5:30
काेराेना संसर्ग पाहता शासकीय कार्यालयांमध्ये नाेव्हेंबर, डिसेंबर या काळात विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे पहायला मिळाले. मात्र सद्य:स्थितीत काय ...

शासकीय कार्यालयांतील सॅनिटायझरच्या बाॅटल रिकाम्या; मास्कचा वापरही नाही
काेराेना संसर्ग पाहता शासकीय कार्यालयांमध्ये नाेव्हेंबर, डिसेंबर या काळात विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे पहायला मिळाले. मात्र सद्य:स्थितीत काय खबरदारी घेतली जात आहे याबाबत ‘लाेकमत’च्या वतीने ३० जानेवारी राेजी रिॲलिटी चेेक केले असता काेणत्याच कार्यालयात सॅनिटायझरचा वापर दिसून आला नाही. काही कार्यालयांमध्ये सॅनिटायझरच्या रिकाम्या बाॅटल ठेवलेल्या आढळून आल्या. थर्मलगनचा वापर तर कुठेच दिसून आला नाही.
नगर परिषद कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात हा प्रकार आढळून आला. कार्यालयात येणारे नागरिकही बिनधास्तपणे वावरतांना दिसून आले.
जिल्ह्यात ७११० काेराेना पाॅझिटिव्ह असून, १५३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची नाेंद आहे.
...............
गत १५ दिवसांत आढळलेले काेराेना रुग्ण
दिनांक
१५ जानेवारी २८
१६ जानेवारी १२
१७ जानेवारी ३३
१८ जानेवारी १६
१९ जानेवारी ०४
२० जानेवारी ०७
२१ जानेवारी २४
२२ जानेवारी २१
२३ जानेवारी २३
२४ जानेवारी १२
२५ जानेवारी १६
२६ जानेवारी ०९
२७ जानेवारी २५
२८ जानेवारी ३२
२९ जानेवारी १५