रोजगार सेवकांची दिवाळी अंधारात जाणार
By Admin | Updated: October 21, 2014 00:28 IST2014-10-21T00:00:44+5:302014-10-21T00:28:30+5:30
वाशिम तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांना एप्रिल २0१४ पासूनचे मानधन मिळालेच नाही.

रोजगार सेवकांची दिवाळी अंधारात जाणार
देपुळ ( वाशिम): वाशिम पंचायत समितीअंतर्गत येणार्या सर्व ग्राम रोजगार सेवकांना मग्रारोहयो योजनेतून मिळणारे २.२५ टक्के मानधन एप्रिल २0१४ पासून मिळाले नसल्याने ग्राम रोजगार सेवकांची दिवाळी अंधारात जाणार आहे. वाशिम पं.स. अंतर्गत कोट्यवधी रुपयाचे कामे मग्रारोहयोची झालीत या कामाच्या मुख्य भूमिकेत ग्राम रोजगार सेवक असतो, त्याला यामध्ये अकुशल कामाच्या २.२५ टक्के मानधन स्वरुपात दिल्या जातात. परंतु मग्रारोहयोच्या महत्वाचा कणा असलेला ग्राम रोजगार सेवक एप्रिल २0१४ पासून मानधनापासून वंचित असून त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. याकडे मग्रारोहयो प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.