शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

सुटीच्या दिवशीही कर विभागातील कर्मचारी कर्तव्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 13:08 IST

मार्च अखेरपर्यंत शंभर टकके करवसुलीसाठी नगरपरिषदेचा कर विभाग सरसावला असून सुटीच्यादिवशीही कर्मचारी कर्तव्य बजावतांना दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. मार्च अखेरपर्यंत शंभर टकके करवसुलीसाठी नगरपरिषदेचा कर विभाग सरसावला असून सुटीच्यादिवशीही कर्मचारी कर्तव्य बजावतांना दिसून येत आहे. शनिवार ९ मार्च रोजी सुटी असताना कर विभागातील कर्मचारी कराचा भरणा करुन घेण्यासाठी कार्यालयात हजर दिसून आलेत. विशेष म्हणजे ३१ मार्चपर्यंत रात्री उशिरापर्यंत कार्यालय सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्हयातील चारही नगरपालिकांमध्ये सर्वाधिक कर वसुली करण्याचे कार्य दरवर्षी वाशिम नगरपरिषदेच्यावतिने करण्यात येते. याहीवर्षी १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी केल्याने कर विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी पुढाकार घेतला आहे. ज्या नागरिकांकडे कर थकीत आहे त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे सुतोवाच नगरपरिषद मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी केल्याने कराचा भरणा करण्यासाठी नागरिक पुढाकार घेतांना दिसून येत आहेत. नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी सुध्दा शहर विकासाच्या दृष्टीने कराचा भरणा करणे आवश्यक असल्याने नागरिकांनी या मोहीमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.  वाशिम नगरपरिषदेची करवसुली १०० टक्के करण्यासाठी  मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरिक्षक अ.अजिज अ. सत्तार, एस.एम. उगले, करसंग्राहक एस.एल. किरळकर, एस. ए. इंगळे, डी.एल. देशपांडे, एस.एस. काष्टे, आर.एच. बेनीवाले, के.आर हडपकर, एन.के. मुल्ला, के.डी. कनोजे, एस.एल. खान, अ.वहाब शे. चाँद परिश्रम घेत आहे. शहराच्या विकासासाठी कराचा भरणा करणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांना पुरविण्यात येणाºया सुविधा मिळाव्यात यासाठी कराचा भरणा प्रत्येक नागरिकांनी करणे आवश्यक आहे. मार्च अखेरपर्यंत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व करसंग्राहकांना सुटीच्या दिवशी कामे करण्याबाबत व रात्रीही कार्यालये उघडे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व अधिकारी, कर्मचारी करवसुलीसाठी मोलाचे प्रयत्न करीत आहेत.-वसंत इंगोलेमुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम शहरातील थकीत कर असलेल्या नागरिकांनी कराचा भरणा करुन कारवाई टाळावी. कराचा भरणा वेळेत न करणाºया व्यक्तिंवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नळ कनेक्शन सुध्दा बंद करण्यात येणार असल्याने कराचा भरणा करुन या कारवाईस टाळावे व नगरपरिषदेला सहकार्य करावे-अ.अजिज अ. सत्तारकर निरिक्षक, वाशिम नगरपरिषद

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका