कर्मचारी कर्तव्याला जागले !
By Admin | Updated: May 20, 2014 22:43 IST2014-05-20T22:01:27+5:302014-05-20T22:43:30+5:30
सुरळीत वाहतुकीसाठी यंत्रणा सरसावली : कर्मचार्यांना दिल्या सूचना

कर्मचारी कर्तव्याला जागले !
वाशिम : शहरातील विस्कटलेल्या वाहतुकीची घडी निट बसविण्याची जबाबदारी असलेल्या शहर वाहतुक शाखेचीच घडी विस्कटली असल्याचे वृत्त २0 मे रोजी ह्यलोकमतह्णने प्रकाशित करताच, पोलिस विभागात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत शहर वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी सर्व कर्मचार्यांना कर्तव्याच्या वेळी चौकात हजर राहण्याचे तसेच यापुढे दांडीबाज कर्मचार्यांची गय करणार नसल्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. दरम्यान आज ह्यलोकमतह्णने चमूने केलेल्या पाहणीत कर्मचारी वेळेवर चौकात तैनात झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील वाहतुक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी शहर वाहतुक शाखेच्या खांद्यावर पोलिस विभागाने सोपविली आहे. एक सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि अन्य २४ कर्मचारी या जबाबदारीसाठी तैनात करण्यात आले आहेत. पूर्वीच्या तुलनेत तब्बल ७ ते ९ कर्मचारी अतिरिक्त देण्यात आले आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतुक ताळ्यावर आणणे शहर वाहतुक शाखेला फारसे अवघड काम नाही. मात्र, तरीदेखील शहरातून तिबल सीट, फॅन्सी नंबरची वाहनं, गर्द काळ्या काचेची वाहनं, प्रवाशांनी खचाखच भरलेली खासगी प्रवासी वाहनं वाहतुकीच्या नियमांना चिरडत सुसाट वेगाने धावत असल्याचे चित्र ह्यलोकमतह्णने स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आणले होते. या वृत्ताची दखल घेत सहायक पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी तातडीने सर्व कर्मचार्यांना शहरातील वाहतुक सदैव सुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले. शहरातील खड्डामय रस्त्यांचा तसेच विकासात्मक कामांसाठी रस्त्यांची खोदाई सुरू आहे. या बाबीचा वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात मोठा अडथळा येत असल्याचेही पवार यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. वाहतुकीच्या नियमांना चिरडणार्या वाहनांवरील कारवाईची मोहीम तीव्र करण्याच्या सूचनाही पवार यांनी कर्मचार्यांना दिल्या आहेत. कर्तव्याच्या वेळी कुणी हलगर्जीपणा करीत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवण्याला पहिले प्राधान्य द्या, अशा कानपिचक्या श्रीराम पवार यांनी दिल्या आहेत. दरम्यान, आज कर्तव्य सुरू होण्याच्या वेळी प्रमुख चौकांमध्ये वाहतुक कर्मचार्यांची उपस्थिती आढळून आली. सायंकाळी ४.३0 वाजतानंतरदेखील कर्मचार्यांनी चौकात वेळेवर हजेरी लावून अवैध वाहनांवर कारवाई करण्याची मोहिम राबविली. गत आठवड्यापासून ३0 ते ४0 अवैध प्रवासी वाहनं, तिबल सीट, फॅन्सी नंबर व वाहतुकीचे नियम मोडणार्या एकूण ४५0 वाहनांवर कारवाई केली आहे.