शेतकºयांना तातडीचे कर्ज वाटप !
By Admin | Updated: June 20, 2017 13:27 IST2017-06-20T13:27:43+5:302017-06-20T13:27:43+5:30
२० जून रोजी रिसोड तालुक्यातील शेतकºयांना तातडीचे १० हजारांचे कर्ज वाटपाचा शुभारंभ केला.

शेतकºयांना तातडीचे कर्ज वाटप !
रिसोड : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईपर्यंत शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केली असून, २० जून रोजी रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीचे १० हजारांचे कर्ज वाटपाचा शुभारंभ केला. खरिपाच्या पेरणीला सुरूवात झाली असून, शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज म्हणून १० हजार रुपये देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी राष्ट्रीयकृत बँकांना अद्याप केलेली नाही. मात्र, दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निर्णयाची अंमलबजावणी करीत मंगळवारी रिसोड तालुक्यातील तीन शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. तालुक्यात एकूण शेतकरी सभासद ३७८९ असून, या शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे तातडीचे कर्जवाटप केले जाणार आहे.