पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजनेचा बोजवारा

By Admin | Updated: October 26, 2014 00:22 IST2014-10-26T00:22:41+5:302014-10-26T00:22:41+5:30

रिसोड तालुक्यात पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजनेच्या निधीचा अपव्यय.

Elimination of Environmental Balanced Village Samrudhi Yojana | पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजनेचा बोजवारा

पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजनेचा बोजवारा

मालेगाव (वाशिम): पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने सुरू केलेल्या पर्यावरण संतुलन ग्राम योजनेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. सन २00८ मध्ये पर्यावरण संतुलन ग्राम योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये झाडे लावणे, त्याची जोपासना करणे, त्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी यामधून जमा झालेल्या ५0 टक्के रकमेचा खर्च वृक्षलागवडीसाठी खर्च करण्याच्या सूचनाही ग्रामपंचायत व ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतींनी घरपट्टी व पाणीपट्टीची सक्तीची वसुली करत पर्यावरण संतुलन ग्राम योजना राबवण्यास सुरुवात केली होती. काही गावातील अपवाद वगळता गेल्या ६ वर्षात कुठेही जिवंत झाडे पाहावयास मिळत नाही त्यामुळे घरपट्टी, पाणी पट्टी पोटी वसूल केलेला निधीच्या ५0 टक्के खर्च केलेला निधी गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवर पदाधिकारी व प्रशासनाचे अधिकारी याची प्रभारी अंमलबजावणी करीत नसल्याचे चित्र आहे. मालेगाव तालुक्यात २0 गावांचा सहभाग होता आता यावर्षी किमान २५ गावे त्या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त गावात या योजनेत सहभागी करून घेणार असल्याचे गट विकास अधिकारी संदीप पवार यांनी सांगीतले.

*काय आहे ही योजना?

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या निर्णयानुसार सन २00८ मध्ये पर्यावरण संतुलन ग्राम योजना सुरू करण्यात आली. यामध्ये गावातील लोकसंख्येच्या ५0 टक्के वृक्षलागवड करावी, घरपटी पाणीपट्टी यामध्ये वसुली करून ५0 टक्के रक्कम वृक्षलावडीसाठी खर्च करावी; मात्र वसुली ६0 टक्क्यापेक्षा जास्त गावांमध्ये ५0 टक्केपेक्षा जास्त नागरिक शौचालयाचा वापर करणो आवश्यक आहे. वृक्षलागवड ही गावठाणचा परिसर, ई क्लास, एफ क्लास येथे करावी दुसर्‍या व तिसर्‍या वर्षात वसुली १00 टक्के करावी.

Web Title: Elimination of Environmental Balanced Village Samrudhi Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.