दारु विक्रीविरुद्ध तळपच्या महिलांचा ‘एल्गार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:19 IST2017-08-18T01:19:39+5:302017-08-18T01:19:45+5:30

मानोरा: तालुक्यातील तळप बु. येथील हातभट्टीची दारु, देशी दारुविक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी १७ ऑगस्ट रोजी मानोरा पोलीस ठाण्यात धडक देऊन दारु विक्री तत्काळ बंद करण्याची मागणी लावून धरली.

'Elgar' women of liquor against liquor sale! | दारु विक्रीविरुद्ध तळपच्या महिलांचा ‘एल्गार’!

दारु विक्रीविरुद्ध तळपच्या महिलांचा ‘एल्गार’!

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा: तालुक्यातील तळप बु. येथील हातभट्टीची दारु, देशी दारुविक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी १७ ऑगस्ट रोजी मानोरा पोलीस ठाण्यात धडक देऊन दारु विक्री तत्काळ बंद करण्याची मागणी लावून धरली.
तळप बु. येथे मोठय़ा प्रमाणात बेकायदा व्यवसाय सुरू आहेत. गावात हातभट्टीची दारू राजरोसपणे काढली जाते. देशीदारूचे पावटे विकल्या जात आहेत. त्यामुळे मोठय़ा माणसांसोबतच गावातील युवा मंडळी देखील व्यसनाधिन होत आहे. त्यामुळे  अनेकांचे संसार देशोधडीला लागले असून, घराघरात वाद होत आहेत. दारूविक्रीसोबतच गावात जुगारही मोठय़ा प्रमाणात खेळला जात आहे. यासंदर्भात अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी दिल्या; परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे अखेर त्रस्त झालेल्या महिलांनी थेट पोलीस ठाणे गाठून ठाणेदार रामकृष्ण मळघने यांची भेट घेऊन गावात सुरू असलेला प्रकार तत्काळ बंद करण्याची गळ घातली. 
यावेळी अंतकला बबन घोरसडे, पंचफुला आत्माराम मळघने,  सिंधुताई मोतीराम साखरकर, गौकर्णा बापुराव पांडे, सुमित्राबाई नामदेव दावणे, शोभा तुकाराम शिंदे, गौकणा मधुकर कवठकर, कल्पना रामप्रभू शिंदे,  कांता सीताराम शिंदे, कांता विजय दानवे, उपसरपंच भगवान राठोड, तंटामुक्तीचे अध्यक्ष नामदेव धोंगडे, पोलीस पाटील राजू गोदमले आदींची उपस्थिती होती. 
दरम्यान, मालेगाव तालुक्यातील मारसूळ येथील महिलाही दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी १७ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यावर धडकल्या. यात सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटलासह असंख्य महिलांचा समावेश होता. 

Web Title: 'Elgar' women of liquor against liquor sale!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.