शासकीय कार्यालयांमध्ये विजेचा अपव्यय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:50 AM2017-08-19T00:50:54+5:302017-08-19T00:51:07+5:30

वाशिम: विजेचा अपव्यय होऊ नये, अशी सूचना कार्यालयातील विविध कक्षाच्या दरवाजांवर लावली असतानाही कर्मचारी, अधिकारी त्या सुचनेचे उल्लंघन करून बाहेर पडताना वीज दिवे आणि पंखे यासारखी वीज उपकरणे सुरूच ठेवत असल्याचा प्रकार वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यालयात सुरू आहे. लोकमतकडून शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा प्रकार उघडकीस आला.

Electricity wastage in government offices! | शासकीय कार्यालयांमध्ये विजेचा अपव्यय!

शासकीय कार्यालयांमध्ये विजेचा अपव्यय!

Next
ठळक मुद्देरिकाम्या कक्षातील उपकरणे सुरूचबांधकाम विभाग वाशिम कार्यालयातील प्रकार

शिखरचंद बागरेचा । 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विजेचा अपव्यय होऊ नये, अशी सूचना कार्यालयातील विविध कक्षाच्या दरवाजांवर लावली असतानाही कर्मचारी, अधिकारी त्या सुचनेचे उल्लंघन करून बाहेर पडताना वीज दिवे आणि पंखे यासारखी वीज उपकरणे सुरूच ठेवत असल्याचा प्रकार वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यालयात सुरू आहे. लोकमतकडून शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा प्रकार उघडकीस आला.
पारंपरिक उज्रेचे स्रोत दिवसेंदिवस कमी होत असताना विजेचा काटकसरीने आणि योग्यरीत्या वापर करणे गरजेचे आहे. शासकीय कार्यालयांकडून त्याचे पालनही करण्यात येते. विजेचा काटकसरीने आणि योग्य वापर करण्यासाठी वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हास्तर कार्यालयातही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार विविध कक्षातील दरवाजांवर सूचना लावली आहे. बाहेर पडताना वीज उपकरणे बंद करावीत, असे स्पष्ट त्यावर नमूद केले आहे; परंतु काही अधिकारी, कर्मचारी या सुचनेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसून आले. यावेळी बांधकाम विभागाच्या कार्यालयातील चित्रशाखेच्या कक्षात अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नसतानाही या कक्षातील पंखे आणि वीज दिवे सुरूच होते.  त्याशिवाय इतरही एक दोन कक्षात अधिकारी, कर्मचारी नसतानाही वीज दिवे सुरूच असल्याचे दिसले. हा प्रकार नेहमीच घडत असल्याने विजेचा अपव्यय मोठय़ा प्रमाणात होत आहे.

विजेचा काटकसरीने वापर करण्यावर आमचा भर आहे. त्याबाबत दिलेल्या सुचनांचे सर्व अधिकारी, कर्मचारी पालनही करतात. शुक्रवारी काही कर्मचारी कामानिमित्त वरिष्ठांकडे गेले असतील, त्यावेळीच त्यांच्या कक्षातील उपकरणे सुरू असल्याचे दिसले असेल, कार्यालय बंद करताना कोणीही वीज उपकरणे सुरु ठेवत नाहीत.           
-व्ही. ए. चेके 
उपअभियंता, सा. बां.विभाग वाशिम

Web Title: Electricity wastage in government offices!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.