शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वाशिम जिल्ह्यात वीजचोरीचे प्रमाण वाढतेच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 16:41 IST

Washim News वीज चोरी रोखण्यासाठी महावितरण कंपनीकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात वीजचोरीचे प्रकार सतत वाढत आहेत.  त्यात थेट विद्युत तारांवर थेट आकडा टाकून विजेची चोरी करण्यासह विद्युत मीटरशी छेडछाड करुन किमान पन्नास पद्धतीने मीटरमध्ये फेरफार करुन वीज चोरी केली जात आहे. त्यामुळे महावितरणला कोट्यवधींचा फटका बसत असून, विद्युत मीटर अधिक सुरक्षित करण्याचे आव्हान महावितरणसमोर उभे ठाकले आहे.  घरगुती अथवा औद्योगिक वीजचोरीसाठी चोरट्यांकडून पुर्वी विद्युत तारांवर आकडे टाकण्याची पद्धत सर्रास वापरली जात होती. ग्रामीण भागात आजही हे प्रकार सुरू आहेत. त्याशिवाय पूर्वी मीटरमध्ये लोखंडाची चकती होती. तेव्हा ती लोहचुंबक लावून तिचे फिरणे थांबविले जायचे. आता मीटरही डिजिटल आकड्यांचे झाले. मीटर आधुनिक झाली, तशी त्या प्रमाणे चोरही अनेक क्लृप्त्या लढवून विद्युत चोरीचे नवीन मार्ग शोधत असून, जिल्ह्यात एकूण वापराच्या २५ टक्के विजेची चोरी होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज चोरी रोखण्यासाठी महावितरण कंपनीकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.

ग्रामीण थकबाकी जास्तजिल्ह्यात एकूण वीज वापराच्या २५ टक्के वीजेची चोरी होत असल्याचा प्रकार घडत असतानाच थकबाकीचे प्रमाणही लक्षणीय आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागांत वीजेची थकबाकी मोठी आहे. शेतकरी, घरगुती आणि व्यावसायिक ग्राहक मिळून तब्बल ४९ लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असल्याची माहिती महावितरणकडून प्राप्त झाली आहे. 

जिल्ह्यात केवळ एक गाव विजेविनावाशिम जिल्ह्यात एकूण ६९० गावे आहेत. गाव तेथे वीज या धोरणानुसार प्रत्येक गावात वीज महावितरणकडून पोहोचविण्यात आली. तथापि, जिल्ह्यातील एका गावात अद्याप वीज पोहोचू शकली नाही. या गावापर्यंत वीज पोहाेचविण्यासाठी पुरेसा निधी नसल्याने काम प्रलंबित असून, येत्या काही महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.  निधीसाठी महावितरणकडून पाठपुरावा केला जात आहे.

 जिल्ह्यात अनधिकृतपणे तारावर केबल टाकून वीज चोरी करणाऱ्यांवर भरारी पथकाकडून कारवाई केली जात आहे. आजवर १२९ लोकांवर  दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई कायम राहणार आहे. -आर. जी. तायडे,            

 कार्यकारी, अभियंता महावितरण

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण