आठ दिवसांपासून वीज पूरवठा बंद
By Admin | Updated: August 18, 2016 00:42 IST2016-08-18T00:42:57+5:302016-08-18T00:42:57+5:30
खंडाळा येथील नवीन रोहित्र जळाले; दैनंदिन कामकाजात व्यत्यय.

आठ दिवसांपासून वीज पूरवठा बंद
शिरपूरजैन,(जि. वाशिम), दि. १७ : येथून जवळच असलेल्या खंडाळा शिंदे येथील नवीन विद्युत रोहित्र पहिल्याच दिवशी जळाल्याने गत आठ दिवसांपासून गावावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. पिठाच्या गिरण्या व विद्युत उपकरणे बंद असल्याने दैनंदिन कामकाजात व्यत्यय निर्माण झाला आहे.
साधारणत: १0-१२ दिवसांपूर्वी खंडाळा शिंदे येथील जूने विद्युत रोहित्र जळाले. गावकर्यांच्या मागणीनुसार येथे नवीन रोहित्र १0 ऑगस्टच्या दरम्यान बसविण्यात आले. पहिल्याच दिवशी नवीन रोहित्रदेखील जळाले. तेव्हापासून याकडे कुणीही लक्ष दिले नाही. परिणामी, गत आठ दिवसांपासून गावकरी अंधारात आहेत. वीजपुरवठय़ाअभावी पाणीपुरवठा प्रभावित झाला असून, पिठाच्या गिरण्यादेखील बंद आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
खंडाळा येथील विद्युत रोहित्र कशामुळे सतत जळत आहे, याची पाहणी महावितरणकडून केली आहे. लवकरात लवकर खंडाळा येथे नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात येईल.
- अतुल देवकर
प्रभारी कार्यकारी अभियंता, महावितरण, शाखा वाशिम.