लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर (वाशिम) : शॉर्टसर्किट होऊन गोठ्यात बांधून असलेल्या ८ जनावरांना विजेचा जबर शॉक लागल्याने ती जागीच दगावल्याची घटना तालुक्यातील कोळंबी येथे २३ आॅगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. यात शेतकरी साबीर मुसा फकीरावाले यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले.प्राप्त माहितीनुसार, कोळंबी येथे साबीर फकीरावाले यांच्या शेतात गुरांचा गोठा असून सकाळच्या सुमारास त्यात दोन बैल, पाच गायी आणि एक गोरा अशी आठ जनावरे बांधून होती. यादरम्यान अचानक शॉर्ट सर्किट होऊन आठही जनावरांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, नैसर्गिक संकटांमुळे आधीच जेरीस आलेल्या साबीर फकीरावाले यांचे लाखमोलाचे पशुधन विज हानीत ठार झाल्याने ते अधिकच संकटात सापडले आहेत. प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा करून आपणास नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी फकीरावाले यांनी केली आहे.
विजेचा शॉक लागून ८ जनावरे दगावली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:48 IST